धान्याच्या पोत्यानी भरलेला ट्रक उलटला

0

एरंडोल : येथील बस स्थानकाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने धान्याच्या पोत्यानी भरलेला ट्रक उलटल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

धान्याच्या पोत्यानी भरलेला ट्रक क्रमांक (एपी -१६ टीई -७१२३) हा पद्मालय रस्त्यावरून पारोळा पोलीस चौकीजवळ आला असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात चालक आणि क्लिनर जखमी झाला असल्याचे समजते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याप्रकरणी उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.