देशभरातील करोनाबाधितांची संख्येने ओलांडला ९ लाखांचा टप्पा

0

नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. मागील २४ तासांत २८ हजार ४९८ नवे रुग्ण आढळले आले. त्यामुळे देशभरातील करोनाबाधितांची संख्येने ९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात ५५३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

देशभरातील करोनाबाधितांची संख्या आता ९ लाख ६ हजार ७५२ वर पोहचली आहे. यामध्ये अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ३ लाख ११ हजार ५६५ असून, आतापर्यंत ५ लाख ७१ हजार ४६० जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत देशभरात २३ हजार ७२७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.