तालुक्यातील पहान येथे विविध आजारांवर जनजागृती शिबीर संपन्न

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पहाण ता. पाचोरा येथे विविध प्रकारे होणारे आजारांविषयी नाथ मंदिर, जारगाव (पाचोरा) येथील नाथ मंदिर चे ट्रस्ट अध्यक्ष हरी धुडकू महाजन व सोनाई ग्रुप मार्फत सर्व आजारा विषयी जनजागृती करण्यात आली. येथील ग्रामस्थांना चौका चौका जावुन जन जागृत करून मार्गदर्शन केले.

आजार झाल्यावर स्वास बदल करून आजारावर मात कशी करता येईल ? या विषयी मार्गदर्शन करून फलक लावण्यात आले आहे. या कार्येक्रमात ग्रामस्थांनी प्रतिसाद देत पहाण येथील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्त मोठया संख्येने उपस्तित होते. तसेच पहाण येथील आरोग्य दुत शकील पटेल व अकील पटेल यांचा ही सत्कार “सोनाई ग्रुप पाचोरा” यांनी यावेळी केला व ग्रामस्थांतर्फे पहान येथील ह. मु. मुंबई येथील शांताराम दौलत पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.