तरुणीची धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्त्या

0

जळगाव । एका तरुणीने धावत्या रेल्वेखाली आत्महत्त्या केल्याची घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील आशाबाबा नगरातील बोगद्याजवळ घडली.  दरम्यान आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

शहरातील आशाबाबा नगरातील बोगद्याजवळ असलेल्या रेल्वे डाऊन रेल्वे लाईवर अंदाजी 22 ते 25 वर्षीय अनोळखी तरूणीने धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्त्या केली.  तिच्या जवळ एक पिशवी आढळून आली. त्यात झोपेच्या गोळ्यासह इतर औषधी आणि दोन बिसलरीच्या पाण्याच्या बाटल्या मिळून आल्यात. दरम्यान, घटना दुपारी 1 वाजता घडल्यानंतर सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत तरूणीचा मृतदेह पडून होता. दरम्यान आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीसात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.