कार्यकर्ते हेच पक्षाचे बळ -ना. सुधीर मुनगंटीवार

0

सावदा (प्रतिनिधी) गेल्या पाच वर्षात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला जे यश मिळाले अवघ्या पाच वर्षात सत्तेत असताना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर तसेच पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ प्रमुख यांनी घेतलेली प्रचंड मेहनत या जोरावरच पक्ष बळकट आहे. येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीतही बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी आपल्या रावेर मतदार संघासह प्रचंड मेहनतीने पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांच्या लीड ने विजय करावे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सावदा येथे रावेर विधानसभा क्षेत्र विधानसभा निवडणूक कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना प्रतिपादन केले.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, राज्याचे उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हाध्यक्ष संजय पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, सभापती माधुरी नेमाडे, यावल सभापती पल्लवी चौधरी, रावेर तालुका अध्यक्ष सुनील पाटील, यावल तालुका अध्यक्ष नरेंद्र कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायफळे, पद्माकर महाजन, तालुका महिला आघाडी अध्यक्ष नेहा गाजरे, कांचन फालक सगायो अध्यक्ष शिवाजी पाटील, विलास चौधरी,  जिल्हा बँक चेअरमन रोहिणी ताई, रावेर यावल तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. हे सरकार सर्व स्तरावर यशस्वी ठरल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आपल्या पक्षाला बहुमत मिळणार असून प्रत्येक कार्यकर्त्याने जास्तीत जास्त मतदान आपल्या बुधवार करून घ्यावे जेणे करून आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले सदर वेळी मान्यवरांच्या हस्ते आमदार हरिभाऊ जावळे यांच्या पाच वर्षाच्या कार्य वृत्ताचा बांधिलकी या पुस्तकाचे प्रकाशन हे करण्यात आले.

राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असे विचार व्यक्त करून प्रत्येक बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक बुधवारी आपल्याला जी मते मिळाली त्यापेक्षा जास्त मिळून दाखवावे व यासाठी मतदार यांचा अभ्यास करून प्रत्येक मतदाराला मतदान पर्यंत पोहोचवावे तसेच गेल्या 52 वर्षात काँग्रेसने सत्ता उपभोगून सर्व स्तरातील जनतेला उपेक्षित ठेवले. याउलट अवघ्या पाच वर्षात महाराष्ट्रातील भाजप सरकारने सर्व स्तरावर चांगली कामगिरी करून विकासाचा डोंगर उभा केला आहे. रावेर मतदारसंघातील हरिभाऊंनी विकासाची कामे केली असून मतदार संघात अनेक उपरे उमेदवार फिरत आहे. मात्र भाजपमध्ये संस्कृतच उमेदवार असावा लागतो असा टोला त्यांनी मारला

सदर वेळी सावदा शहराध्यक्ष पराग पाटील सर्व नगरसेवक भाजप कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले प्रस्तावित वासू नरवाडे यांनी केले तर आभार डॉक्टर मिलिंद यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.