जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक एप्रिल अखेर होण्याची शक्यता

0

 जळगाव प्रतिनिधी | जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची स्थगित झालेली निवडणूक घेण्यास जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी डॉ. ज्योती लाटकर यांनी गुरुवारी आदेश दिले आहेत. त्यानुसार बँकेच्या संस्था सभासद प्रतिनिधींचे उर्वरित ठराव १५ ते २२ फेब्रुवारीपर्यंत मागवण्यात आले आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एप्रिल अखेर किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बँकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

 

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १० डिसंेबर २०१९ रोजीच्या पत्रानुसार जिल्हा बँकेच्या सभासद यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. प्राधिकरणाने २३ डिसंेबर रोजी बँकेच्या सभासद संस्थांकडून ठराव मागणीच्या अंतिम दिनांकास ३१ जानेवारी २०२०पर्यंत मुदतवाढ दिलेली होती. २७ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. ज्या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र स्वीकारणे सुरु झालेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.