जळगावातील कंजरवाडा परिसरात खुलेआम दारू विक्री ; एकास अटक

0

जळगाव (प्रतिनिधी) । राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने अनेक कडक निर्णय घेतले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. असं असताना जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात खुलेआम दारू विक्री करणाऱ्या एकास एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या पथकाने छापा टाकून अटक केली आहे.

संचारबंदीमुळे शहरातील सर्व दारू विक्रीची दुकाने, परमीट रूम आणि बियर बार बंद असतांनाही बर्‍याच ठिकाणी अवैध दारू विक्री होत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज भर दिवसा कंजरवाडा परिसरात दारू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यांनी येथे छापा मारून मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त करून एका इसमाला ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.