चोसाकाबाबत शेतकर्‍यांची बैठक व तहसीलदारांना निवेदन

0

 

चोपडा दि. 3 –
शेतकरी कृती समिती ची बैठक आज दि 3जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता विश्रामगृह चोपडा येथे सम्पन्न झाली .
त्यात खालील विषयावर चर्चा करण्यात आली (1)शेतकर्‍यांच्या चोपडा साखर कारखान्याच्या थकीत उसाच्या पेमेंट चे धनादेश 10ऑक्टोम्बर च दिलेले होते ते जर 10जानेवारी पर्यंत शेतकर्‍यांनी वटवण्यासाठी टाकले नाहीत तर त्यांची किंमत झिरो होईल ते शेतकर्‍यांनी सोमवार पर्यंत बँकेत टाकावीत, तसेच ज्यांचे धनादेश वटले नाहीत त्यांनी एक महिन्याच्या आत नोटीस देणे बंधनकारक होते व तश्या दिलेल्या देखील आहेत त्यांच्या नोटिसा दिल्या नंतर एका महिन्याच्या आत गुन्हा नोंदवला पाहिजे, त्यानुसार पुढील आठवड्यात व्यक्तिगत गुन्हे नोंदवले गेले पाहिजेत त्यासाठी ची कायदेशीर मदत कृती समिती उपलब्ध करून देणार आहे व तसे काही शेतकर्‍यांनी गुन्हे नोंदवले देखील.
ज्या शेतकर्‍यांच्या ऊस उभे आहेत व त्यांना ऊस तोंडी बाबत अडचणी असल्यास कृती समिती कडे नावे नोंदवावीत म्हणजे पुढील आठवड्यात सर्व कारखानदार शी चर्चा करून संयुक्तिक बैठक ठेऊन नियोजन केले जाणार आहे.
त्यासोबत परवा पंतप्रधानांनी देशात दुष्काळ व बाजारभाव पडल्याने बँकांचे कर्ज वाढत आहे जेथे राज्य शासनाने कर्जमाफी केली तेथे बँक वाचल्यात पण शेतकर्‍यांना नवीन कर्ज नाही त्यात शेती परवडत नाही म्हणून विकून कर्ज फेडायचे तर गेल्या चार वर्षात निम्म्याने भाव घटलेत व मोदीजी म्हणतात कर्जमाफी ची गरज नाही याचाच अर्थ ते शेतकरी प्रति संवेदनशील नाहीत याचा निषेध नोंदवला गेला.
तसेच प्रधानमंत्री म्हणाले देशात बावीस पिकांना स्वामिनाथन आयोग प्रमाणे दर मिळतो,आपल्या सरकारने किमान आधारभूत किंमत दरवर्षी फक्त 2ते3%वाढवली व ती शासनाने जाहीर केली ती देखील आधीच्याच दहा वर्षाच्या प्रमाणात वाढली मग स्वामिनाथन आयोगा प्रमाणे 50%नफा धरून आधीही मिळत होती का? असा सवाल बैठकीत करण्यात आला होता.व आज अचानक ती स्वामिनाथन आयोगाप्रमाणे कशी झाली,व विशेष म्हणजे जाहीर झाली ती मिळावी म्हणून कायमस्वरूपी हमीभाव खरेदी केंद्र वर सुरु का झाले नाहीत ?आणि तो देखील बाजारभाव मिळाल्याचे दाखवा यासोबत सरकारने विनिमय कायद्यान्वये शेतमाल विक्रीस परवानगी दिली परंतु कांदा अनुदानासाठी बाजार समिती ची पावती ची अट घातली ती रद्द करून पीक पाहणी अथवा सातबारा नोंदीप्रमाणे एकरी रु 40हजार सरसकट अनुदान द्यावे वत्यासोबत म न रे गा च्या कामावर जाणार्‍या शेतकरी चे मजुरीचे पैसे कर्ज खात्यात बँका जमा करीत आहेत ते तात्काळ बंद व्हावे अन्यथा 26जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल व ज्या राष्ट्रीयकृत सह सहकारी बँकांनी पीक विम्याचे पैसे थकवले ते तात्काळ वर्ग व्हावे.
चोपडा कृषी उत्पन्न चोपडा च्या अडावद येथे कांदा विकलेल्या 102शेतकर्‍यांची फसवणूक तुषार अशोक धनगर या व्यापार्‍याने खोटी चेक देण्यासाबत फसवणूक केली त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन मा तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले.
यावेळी एस बी पाटील, अड एस डी सोनवणे, भास्कर पाटील, भरत पाटील, अनिल वानखेडे,राजेंद्र पाटील, अविनाश पाटील, अरुण चौधरी, अजित पाटील, हुकूमचंद पाटील, वासुदेव पाटील, श्याम पाटील, ईश्वर महाजन, अरुण पाटील,रणजित निकम, सुभाष पाटील, साहेबराव पाटील, प्रवीण पाटील, दिलीप पाटील, हुकूमचंद पाटील,शैलेश पाटील,पंडित पाटील,शांताराम पाटील,चंद्रशेखर पाटील,गजानन पाटील,दिलीपसिंग सिसोदिया,जितेंद्र कोळी,लक्ष्मण पाटील,विवेक तळेले,नामदेव पाटील यांच्या सह असंख्य शेतकरी हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.