चला कोरोनाच्या मानसिकतेतून बाहेर पडू या !

0

इयत्ता 5वी ते 8वी च्या विध्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि कृतिशीलता विकसित करण्याच्या दृष्टीने एक  प्रयत्न मूलभूत विज्ञान आणि सौर ऊर्जा केंद्र करत आहे.

मुलांमध्ये ठोस दर्जेदार शिक्षण घेण्याची क्षमता निर्माण करायची असेल तर त्यांना स्वअनुभवातून शिकता यायला हवे. फक्त गुणवतेच्या कक्षेत समाधानी न होता प्रगल्भ बुद्धिवंतांच्या चौकटीत त्यांना बसण्याची संधी मिळवून द्या. अनेक नामवंत शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ् , इंजिनीअर्स , सर्जन यांनी हाताच्या कामाला महत्व देऊन स्वतःचे  कौशल्य विकसित केले . कौशल्याची कास धरूनच त्यांनी संपूर्ण जगाला जिंकले मुलांचा विकास खेळण्यातून होतो हे आपण अनुभवतो आणि ते जगमान्य आहे. वस्तू वापरा आणि फेका संस्कृतीत न ढकलता कचरा ही संपत्ती आहे हे मुलांना समजू द्या. म्हणजेच प्रत्येक गोष्टीचे मूल्यवर्धन किती छान होऊ शकते याची जाणीव मुलांना होईल.

याकरिता आपल्या मुलांना परिसरातील टाकाऊ वस्तूपासून  विविध प्रकारची खेळणी तयार करण्यासाठी आणि त्यांचा अभ्यासक्रमात कसा उपयोग होतो हे समजून घेण्यासाठी ‘ अनुभूती ‘ या आनंददायी कार्यशाळेत सहभागी होण्यास सहकार्य करा. तीन निरनिराळ्या टप्प्यातून मुलामध्ये सर्जनशीलता , कुतूहल , निरीक्षण आणि स्वअध्ययनातून गुणवत्ता वाढवण्याची क्षमता निश्चित निर्माण होते हा गेल्या २८ वर्षांचा अनुभव.

रविवार दिनांक 2 आणि 9 ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा मोफत ऑनलाईन घेण्यात येणार आहे. इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यासाठी नाव नोंदवणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्र.  :  अभय यावलकर 9892739798, 8422972628

Leave A Reply

Your email address will not be published.