गुलाबराव पाटलांच्या स्वागतप्रसंगी जळगाव स्टेशनवर चेंगराचेंगरी ; दोन महिला पदाधिकारी जखमी

0

जळगाव : ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. यात जळगाव ग्रामीणचे शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर प्रथमच त्यांचा आज दुपारी जळगावला आगमन झाले. यावेळी स्वागतप्रसंगी जळगाव रेल्वे स्थानकावरील जिन्यावर चेंगराचेंगरी होऊन दोन महिला पदाधिकारी जखमी झाल्या.

जळगाव स्टेशनवर गुलाबराव पाटलांचं शिवसेनेकडून जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी जिन्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली. यात महिला पदाधिकारी मंगला बारी, शोभा चौधरी या जखमी झाल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.