गिरड येथे ग्रामपंचायत व गिरड विकास मंच ने स्वयं प्रेरणेने केलं आरोग्य सर्वेक्षण

0

भातखंडे (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या गिरड येथील ग्रामप्रशासन आणि गिरड विकास मंचचे तडफदार व्यक्तिमत्व प्रा काशीनाथ पाटील  यांच्या संकल्पनेतून कोरोना प्रतिबंधासाठी उपाय योजना करण्यात आल्या. यात वार्ड निहाय समित्या स्थापन करून गिरड वासियांचे थर्मल स्क्रीनिंग व ऑक्सी मीटरने अॉक्सीजन लेव्हल तपासणी करण्यात आली. घरोघरी जाऊन नागरिकांचे तपासणी झाल्याने लोकांच्या मनात असलेली भीती दूर करण्याचे काम यावेळी करण्यात आले.

तसेच कोरोना प्रतिबंधक लसिकरनासाठी नागरिकांना प्रेरित करण्यात आले ,ज्या नागरिकांमध्ये कोविडचे लक्षणं आढळली त्यांची तपासणी आरोग्य विभागामार्फत डॉ शिम्पी यांच्यामार्फ़त पुनश्च करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात कोरोनाचा वाढणारा धोका व प्रसार थंबवता  येणार आहे. आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गिरड ग्रामसखी, विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सदर सर्वेक्षण करण्यात आले. यापुढेही नागरिकांनी आपल्याला कोरोना ची लक्षणे असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातून ताबडतोब तपासणी करून घ्यावे असे आवाहन सरपंच प्रदीप सोनवणे यांनी केले. तसेच पॉझिटिव्ह रुग्णं व ज्यांना लक्षणं नाहीत अशांनी गावातून फिरू नये. किमान चौदा दिवस घरात कॉरंटाइन रहावे असे देखील आवाहन पोलीस पाटील विनोद मनोरे यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य व  काशिनाथ पाटील यांनी स्वतः देखील घरोघरी जाऊन स्क्रिनिंग चे काम केले. गावातील संशयास्पद व सौम्य लक्षणं असलेल्या रूघ्नांना गावातील शाळेतच विलिनीकरण कक्ष स्थापन करून प्राथमिक उपचार देण्याची व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी सरपंच प्रदिप सोनवणे उपसरपंच प्रतिभा खैरनार, पोलिस पाटिल विनोद मनोरे,  नीलकंठ खैरनार, कैलास सोनवणे, प्रवीण मनोरे, दीपक पाटिल, शोभा कोळी, गिन्यानबाई पाटिल, अश्विनी पाटिल आदी ग्रामपंचायत सदस्य तसेच आशा सेविका अंगणवाडी सेविका, सखी मंच सदस्यां मधून नयना मनोरे, भारती पाटील, संगीता चौधरी, प्रतिभा पाटील, मंगला पाटील, निर्मला पाटील, अमृता पाटील, अर्चना पाटील, विद्या पाटील, वाल्हाबाई पाटील, मंगलबाई पाटील, कवितापाटील, मीना पाटिल पुष्पाबाई पाटील, छबाबाई आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.