कोरोनासंदर्भात चीनमधून मोठी बातमी ; वुहानमधील बंदी उठवणार

0

बीजिंग – जगभर कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असतानाच चीनमधून एक मोठी बातमी आली आहे. कोरोनाच्या धास्तीने हुबेई प्रांतात लागू केलेले लॉकडाऊन चीन मंगलवारी रात्री उठवणार आहे. मात्र, असे असले तरी वुहानमध्ये 8 एप्रिलपर्यंत लॉकडाउन सुरूच राहणार आहे.

चीनमध्ये २३ जानेवारीपासून नागरिक लॉकडाउनमध्ये होते.वुहानमध्ये गेल्या पाच दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, त्यामुळे बंधने शिथिल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानेही वुहानमध्ये रुग्ण आढळला नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. परंतु, परदेशातून आलेले ३९ जण बाधित असल्याचे सांगितले. संसर्ग फैलावू नये, यासाठी त्यांना सक्‍तीच्या होम कॉरंटाइनचे आदेश दिले आहेत. दरम्यान, देशातील मृतांचा आकडा ३ हजार २७० वर पोचला आहे. त्यामध्ये रविवारी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९ होती. दुसरीकडे ८१ हजार ९३ जण अजूनही बाधित आहेत. ५ हजार १२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७२ हजार ७०३ जण बरे झाले असून त्यांना घरी सोडले आहे.

संपूर्ण जगाचा विचार करता आतापर्यंत 3 लाख 80 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 16 हजार 497 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताचा विचार करता, भारतात आतापर्यंत 501 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढलून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यापैकी 34 रुग्ण पूर्ण पणे बरे झाले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.