कोरोनामुक्त रुग्णांना माजी आमदारांची सुरक्षिततेसाठी आर्थिक मदत

0

अमळनेर :  सोमवारी कोविड सेंटरमधून 30 रुग्ण घरी सोडण्यात आले त्यांनी घरी जाऊन सुरक्षित रहावे म्हणून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी त्यांना प्रत्येकी 500 रुपये आणि सॅनिटायझर वाटप करून मार्गदर्शन केले.

यावेळी साहेबराव पाटील यांनी अमळनेर कोरोनामुक्त होत असल्याबद्दल डॉक्टर व सर्व कर्मचारी आणि प्रशासनाचे अभिनंदन केले. मात्र, सोमवारी या आनंदात अमळनेर शहरात विविध ठिकाणी होत असलेली गर्दी आवश्यक सेवा वगळता इतरही दुकाने उघडण्यात आली होती. याबाबत चिंता व्यक्त करून नागरिकांच्या बेशिस्तपणा आणि त्याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष यामुळे पुन्हा वेगाने कोरोनाचा शिरकाव होण्याची भीती व्यक्त केली शासनाने 31 मे पर्यंत पुन्हा लॉक डाऊन वाढवले आहे तर प्रशासन त्याची काटेकोर अमलबाजवणी का करीत नाही असा सवाल करून शहरात विविध प्रसंगाच्या निमित्ताने सुशिक्षित आणि सुज्ञ लोक गर्दी करत असल्याचे सांगून याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. सुटका झालेल्या रुग्णांनी आपल्या घरातच राहून साबण, सॅनिटायझर आणि आयुर्वेदिक काढ्याचा उपयोग करण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार स्मिता वाघ , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पोटोडे , डॉ संदीप जोशी , डॉ प्रकाश ताळे , डॉ गिरीश गोसावी , डॉ हेमंत कदम ,डॉ आशिष पाटील नगरसेवक नरेंद्र संदनशिव , मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , संजय चौधरी , संतोष बिऱ्हाडे हजर होते

Leave A Reply

Your email address will not be published.