एरंडोल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे निवेदन

0

एरंडोल प्रतिनिधी |  तालुक्यात जवळपास महिना दीड महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने मुग.उडीद,बाजरी,सोयाबीन,कपाशी,फळांच्या बागा,भाजीपाला व इतर पिकांची प्रचंड हानी झालेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास वाया जाईल कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.याशिवाय सततच्या पावसामुळे घरांची पडझड सुद्धा झालेली आहे.पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून एरंडोल तालुक्यात ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा.अशी मागणी एरंडोल तालुका शिवसेनेतर्फे २० सप्टेबर २०१९ रोजी प्रांताधिकारी विनय गोसावी व तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

तसेच बोंड अळीचे मागील वर्षाचे कपात केलेले ३३ टक्के अनुदान व दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना तत्काळ वितरीत करण्यात यावे अशी हि मागणी निवेदनात नमुद करण्यात आली आहे.निवेदन देतांना शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील,घनश्याम पाटील,राजेंद्र धनगर,राजु वंजारी,मंगेश पाटील,उमेश पाटील,जगदीश पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.