एक लाखासाठी विवाहितेचा छळ ; पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- प्लॉट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत मगणून विवाहितेला मारहाण शिवीगाळ करून छळ करणाऱ्या एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील पतीसह सासरकडील 5 जणांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माया उर्फ वैशाली विनोद सूर्यवंशी (23) रा मारोती मंदिराजवळ कासोदा ता एरंडोल ह मु खराजई ता चाळीसगाव यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  त्यांचे कासोदा येथील विनोद कृष्णा सूर्यवंशी यांचेशी 27/4/2013 मध्ये लग्न झाले लग्नाच्या 4 ते 5 महिन्यानंतर पती विनोद हे मला तुझ्याशी  लग्न करायचे नव्हते मला बळजबरीने लग्न करायला लावले असे म्हणून दारू पिऊन त्रास देत असत व शिवीगाळ करून मारहाण करीत असे शिवाय सासरा, सासू, दीर, आजल सासू हे देखील त्रास देत असत व पती प्लॉट घेण्यासाठी एक लाख रुपायांची मागणी करीत असत याविरोधात कासोदा पोलीस स्टेशन ला तक्रार देखील दिली होती त्यानंतर त्यांनी मुलीसह घरातून हाकलुन दिले.  9/6/2018 रोजी त्या खराजई गावी माहेरी असतांना दुपारी 1 वाजेच्या सुमारास पती विनोद कृष्णा सूर्यवंशी, सासरे कृष्णा गोविंदा सूर्यवंशी, सासू सुशिलाबाई कृष्णा सूर्यवंशी, दीर सागर कृष्णा सूर्यवंशी, आजल सासू दुर्गाबाई संतोष बोंबले सर्व रा मारोती मंदिरासमोर कासोदा ता एरंडोल हे खासगी वाहनाने आले व आमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे असे म्हणून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली व पती विनोदने एक लाख रुपये घरून आणले तरच तुला नांदवेल नाहीतर फारकत देऊन टाकेल व तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली असे म्हटले आहे याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वरील 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक गोपाल भोई करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.