आ.शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने फैजपूर येथील झाडी नदीवरील पूल बांधकामासाठी ५ कोटी रुपये मंजूर

0

फैजपूर प्रतिनिधी: रावेर यावल मतदारसंघातील तळोदा प्रकाशा शाहादा शिरपूर चोपडा यावल रावेर ब -हाणपूर राज्य मार्ग ४ या रस्त्यावर फैजपूर येथील झाडी नदीवरील पूल हा खूप जुना व अरूंद असल्यामुळे त्याची पुर्नबांधणी करण्यासाठी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री ना. अशोकराव चव्हाण, महसूल विभाग मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

आणि अखेर आ.शिरीषदादा चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन फैजपूर शहराला जोडणाऱ्या झाडी नदीवरच्या पूल बांधकामासाठी केंद्रीय निधी अंतर्गत ५ कोटी  रुपयाचा निधी तत्वतः मंजूर झाला असल्याचे नगरसेवक श्री केतन किरंगे व काँग्रेसचे नगरपरिषद गटनेते कलिम खान मण्यार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.