आदर्श ठेवत शांततेत उत्सव साजरे करा :- पो.नि.धनंजय येरुळे

0

भडगाव (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव समितीचे आयोजन दर वर्षी चांगले होते . त्यात आदर्श उपक्रम असतात , डी .जे न वाजवीता पारंपरिक पद्धतीने जयंती निघते याचे पोलीस निरीक्षक येरूळे यांनी अभिनंदन केले. शिवजयंती उत्सव निमित्ताने भडगाव पोलिस ठाण्यात दि. १७ रोजी सायंकाळी 6 वा शांतता समिती बैठकीचे आयोजन पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे या यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.

बैठकीत समिती सदस्य,  माजी पोलीस उपअधीक्षक आर. के. वंजारी,  ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अनिल पवार, माजी पोलीस उपनिरीक्षक अशोक केदार ,अरुण पवार, विजय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन, उत्सव समितीचे निलेश पाटील, रिपाइंचे एस. डी. खेडकर, साहेबराव महाजन, पत्रकार नरेंद्र पाटील, श्रीराम पवार, किरण शिंपी आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन, आर के वंजारी, विजय देशपांडे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद शिंदे, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील आदींनी परिश्रम घेतले .

Leave A Reply

Your email address will not be published.