अखेर ‘त्या’ क्वारंटाईनमध्ये नाचनाऱ्यांवर गुन्हा दाखल

0

पारोळा (प्रतिनिधी) : कोरोना आजारासाठी पूर्ण देश झुंज देत आहे डॉक्टर जीवाची पर्वा न करता रात्र दिवस कोरोनाशी लढा देत आहे. मात्र, पारोळा येथील सप्तर्षी मंगल कार्यालयमध्ये कॉरोनटाईन असलेल्या सात तरुण हे आपल्या मोबाईलवर गाणे लावुन नाचत गात होते.त्यांनी जिल्हाधिकाऱ्यां च्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्याप्रकारणी आज पारोळा येथे गुन्हा या ७ तरूणान वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तामसवाडी ता, पारोळा येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह पेशंट आढळल्याने तामसवाडी येथील ६५ जणांना पारोळा येथील सप्तर्षी मंगलकार्यालय येथील कोविड सेंटरला कोरोनटाईन करण्यात आले होते. त्यातील अमोल खैरनार , रोहित खैरनार, अमोल चौधरी, अनिल चौधरी, अनिकेत चौधरी, योगेश चौधरी, जयेश चौधरी,या ७ तरूणान विरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती उपविभागिय अधिकारी विनय गोसावी यांनी दिली. याबाबत पुढील तपास पो, कॉ, बापूराव पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.