चिनावल येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसह आशा वर्करांना सनिटरायझर किटचे वाटप

0

चिनावल (वार्ताहर): येथील ग्रामपंचायत मार्फत येथील आरोग्य कर्मचारी तसेच आशा वर्कर यांना ॅसनिटरायझर किट चे वाटप ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले.यावेळी लोकनियुक्त सरपंच भावना योगेश बोरोले , उपसरपंच व सर्व सदस्य या वेळी उपस्थित होते.

सरपंच भावना बोरोले , पोलीस पाटील निलेश नेमाडे , सर्व सदस्यांनी आरोग्य तसेच आशा वर्कर ला वाटप केले. सदर वेळी चिनावल प्रा आ.केद्रा चे कर्मचारी , ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते. सदर वेळी सदर ॅसनिटरायझर किट चां वापर करून गावात कोरोना रोगांपासून संरक्षण साठी जनजागृती करण्याचे आवाहन उपस्थितां मार्फत करण्यात आले.

सदर वेळी चिनावल प्रा आ केंद्र च्या वैद्यकीय अधिकारी डॉ विजया झोपे , आरोग्य सेवक सुभाष ठाकूर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. डॉक्टर ठाकूर , तलाठी उमेश बाबूळकर हेही उपस्थित होते. तसेच उपस्थित सर्व कर्मचारी ना मास्क न गोल्ज ही देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.