पोलीस निरीक्षकांना शिविगाळ, नऊ जणांवर गुन्हे दाखल

0

पोलीस स्टेशन मध्ये डोके खांबावर आपटूंन आत्महत्येचा केला प्रयत्न

यावल : –माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याची भाषा करतात असे म्हणत थेट यावल पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध काल दिनांक 26 रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला घटना मंगळवारी नऊ वाजता यावल पोलीस ठाण्यात घडली एका जुन्या गुन्ह्यातील संशयित आरोपी म्हणून अशोक बोरकर यांना अटक करण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली होती.

अटक होणार असल्याची माहिती लागल्याने अशोक बोरेकर सह मनोज बोरकर, सिद्धार्थ उर्फ मुकेश बोरेकर, नितीन उर्फ तुषार अशोक बोरकर, लखन अशोक बोरेकर, संतोष नारायण बोरेकर, लताबाई अशोक बोरेकर, अलकाबाई नारायण बोरेकर, नारायण रामदास बोरेकर हे सर्वजण यावल पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाच्या दालनात आले त्यांनी पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी यांना उद्देशून तुम्ही माझ्यावर आधीच खोटे गुन्हे दाखल केले आहे. आता मला अटक करण्याचे ठरविले आहे असे सांगत हुज्जत घालून गोंधळ घातला. त्यावेळी पोलीस ठाण्यात एक जण मोबाईलवर बोलत होता. ती व्यक्ती आमचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करत असल्याचा संशय घेऊन त्यासही मारहाण केली. पोलिसांनी सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिस स्टेशनमध्ये नऊ जणांनी स्वतःचे डोके खांबावर आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी सर्वांना एका खोलीत बंद करून बसविले यावेळी औषधी च्या नावाने एक जण बाहेर फरार झाला याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणणे पोलिसांना शिवीगाळ आत्महत्येचा प्रयत्न करणे इत्यादी विविध कलमान्वये वरील नऊ जणांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक डी.के. परदेशी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.