मुंबई येथील राजगृहाची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

0

भडगांव (प्रतिनिधी) : मुंबई येथील “जगातले पहिले पुस्तकांसाठी बांधलेले घर म्हणजेच राजगृह”.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेल्या या राजगृहावर दोन आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध राष्ट्रीय महिला मूलनिवासी संघ भडगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आला. तहसीलदार माधुरी आंधळे,पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्याकडे जाहीर निषेध निवेदन कोरोना पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टेंसिंगचे पालन करून देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी मुलनिवाशी ता.अध्यक्ष सुरेखा वाघ,उपाध्यक्ष सिमा पाटील,चर्मकार संघ ता.अध्यक्ष मूलनिवासी सदस्या लता अहिरे, मा.नगरसेविका मुलनिवासी सदस्या योजना पाटील तसेच मूलनिवासी सदस्या प्रतिभा पाटील,आशा कोळी, दिपमाला भद्रे, सोनुबाई पाटील,निता राठोड,ललिता सोनवणे,दिव्या मोरे, वंदना पवार आदि राष्ट्रीय मूलनिवासी महिला पदाधिकारी सदस्या सह आँफशुट विंगचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.