भुसावळ भाजयुमोतर्फे १७ रोजी रक्‍तदान शिबीर

0

भुसावळ (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चा भुसावळ शहर तर्फे कोरोना परिस्थितीत रक्ताचा तुटवडा होऊ नये म्‍हणुन दि.१७ जुन रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्‍यान जळगाव रस्‍त्‍यावरील लोणारी समाज मंगल कार्यालयात सर्व नियमाचे पालन करत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व पदाधिकारी,सर्व नगरसेवक,लोक प्रतिनिधी व सर्व कार्यकर्ते यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यास पुढे येऊन रक्तदान करावे आणि राष्ट्र कार्यात सहभागी व्हावे.नाव नोंदणीसाठी संपर्क
अनिकेत पाटील ८६००८६४४४४ ,अनिरुद्ध कुळकर्णी ८००७११११३० व गौरव आवटे ९०४९४०९५५५ यांच्‍याशी संपर्क साधावा. प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्वांनी सुद्धा पालन करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.