भुसावळात चोरीच्या उद्देशाने फिरणारा संशयीत जाळ्यात

0

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळात कोम्बिंग दरम्यान चमेली नगर भागातील काशी विश्वेश्वर मंदिराजवळ  एक संशयीत चोरीच्या उद्देशाने  लपलेल्या चोरास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.

मोहन सुनील पाटील (19, चमेली नगर, काशी विश्वेश्वर मंदिराजवळ, भुसावळ) यास अटक करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, नाईक रमण सुरळकर, नेव्हील बाटली, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी आदींनी आरोपीला ताब्यात घेतले. प्रशांत रमेश परदेशी यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिस स्टेशनला भादंवि 122 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.