भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील जुना सातरा भागातील कोळी वाड्याजवळ साकेगाव येथील दुध व्यावसायीक नशीर पटेल याच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या संशयीत धीरज शिंदे यांच्या घरातून शहर पोलिसांनी शनिवारी गावठी पिस्तूल जप्त केले आहे.
नशीर पटेल याचा अनैतिक संबंधातून आरोपीने खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. याच पार्श्वभुमीवर पोलिसांनी धीरज शिंदे याला अटक केली होती. शनिवारी त्यांच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरातून एक 20 हजार रूपये कीमतीचे गावठी पिस्तूल मिळून आले. डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, साहील तडवी, संजय पाटील, बंटी सैदाणे, संजय बडगुजर, संकेत झांबरे, अविनाश पाटील यांनी ही कारवाई केली.