बांधकामे खोळंबल्यामुळे उपोषणास बसणार ; सुनिल काळे

0

वरणगांव : येथील नगरपंचायतीमध्ये बांधकाम अभियंत्याची उपस्थिती नसल्यामुळे पाच कोटीची बांधकामे खोळंबली आहेत. त्या विषयी नगर पंचायत मुख्याधिकारी यांना या आधी पत्र देऊन सुध्दा त्याकडे दुर्लक्ष्य करण्यात आले व त्याबाबत कुठलेच पाऊल न उचलल्यामुळे त्या अनुषंघाने आज सायंकाळी पुन्हा एक पत्र देऊन दि .३० एप्रिल पासुन नगराध्यक्ष सुनिल काळे व उप नगराध्यक्ष शेख अखलाख हे नगरपंचायती समोर उपोषणास बसणार आहे. त्या विषयीचे पत्र त्यांनी वरणगांव पो .स्टे . तथा जिल्हाधिकारी जळगांव यांचे कडे पाठविले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.