प्र. डांगरी येथील विकास सोसायटीत ५४ लाख ६७ हजारांचा गैरव्यवहार ; ३० जणांवर गुन्हा

0

पाडळसरे :- प्रगणे डांगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत बनावट दस्तऐवज तयार करून ५४ लाख ६६ हजार ४६० रूपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रगणे डांगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत सन २०१३ ते २०१८ या कालावधीत तत्कालीन संचालक, सचिव, चेअरमन, कर्मचाऱ्यांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक व क्षेत्रीय अधिकारी यांनी संगनमताने पदाचा दुरुपयोग करून ५४ लाख ६६ हजार ४६० रूपयांचा गैरव्यवहार केला. याप्रकरणी एकूण ३० आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल फुला करीत आहेत.

सभासद शेतकऱ्यांचा विश्वासघात- अनिल पाटील
कर्तव्य व जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार न पाडता त्या सर्वांनी संस्थेच्या निधीचा अपहार केला. सभासद शेतकऱ्यांचा विश्वासघात करून फसवणूक केली अशी फिर्याद २३ रोजी जळगाव येथील सहकारी संस्थेचे (पणन) वर्ग एकचे विशेष लेखा परीक्षक अनिल गंगाराम पाटील (वय ४८, रा. जळगाव) यांनी मारवड पोलिस ठाण्यात दिली. अपहार व गैरव्यवहार प्रकरणी एकूण ३० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.

तीस जणांवर गुन्हा दाखल 

सोसायटीचे तत्कालीन सचिव मोहनकुमार गंगाधर पवार (रा.पातोंडा), अनिल शिसोदे, संगीताबाई शिसोदे, अनंतराव शिसोदे, गुलाबराव शिसोदे, उदय शिसोदे, बाळासाहेब शिसोदे, वसंतराव व्ही पाटील, शालिक पाटील, श्रावण भोई, छगन पाटील, अरुण शिसोदे, भाईदास पाटील, प्रशांत कुमावत, मिनाबाई पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निर्मलाबाई चौतमन, कमलाकर शिसोदे, संतोष भोई (मृत) (सर्व रा.प्रगणे डांगरी), नामदेव वानखेडे (रा.कलाली), रामकृष्ण पाटील, रमेश बोरसे (मृत), अशोक पाटील, देवकाबाई भोई, उदय पाटील, जिल्हा बँकेचे तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक दिनकर देसले, गुलाबराव पाटील, जयराम पाटील, किशोर पवार (सर्व रा. अमळनेर).

Leave A Reply

Your email address will not be published.