पाचोऱ्यात संत निंरकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  दि. २१ फेब्रुवारी रोजी पाचोरा येथील संत निरंकारी मंडळ, दिल्ली, शाखा पाचोरा तर्फे प. पु. सतगुरु बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या जयंती निमित्त सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी २ वाजे पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन, जामनेर रोड, पाचोरा या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

 

या रक्तदान शिबिराला जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून  डॉ. रॉय यांच्या टिमचे सहकार्य लाभले व तब्बल १२४ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची नोंद करण्यात आली आहे. या शिबिरामध्ये विशेष करून २० महिलांनी रक्तदान केले. तर १०४ पुरुषांनी रक्तदान केले असून ही कौतुकाची बाब आहे. हरदेवसिंह महाराज १९८० ते २०१६ पर्यंत निर्णकारी मंडळाचे प्रमुख गुरु होते. दर वर्षी संत निरंकारी मंडळाच्या वतीने रक्तदान कार्यक्रमात रक्तदान करण्यासाठी शेकडो भाविक व रक्त दाते पूर्ण श्रध्देने रक्तदान करतात व त्यांना त्वरित प्रमाण पत्र दिले जाते.

 

सतगुरू बाबाजींच्या कथनानुसार “रक्त नालियों में नहीं नाडीयों में बहना चाहिए” या संत वचनाचे पालन म्हणून सर्व भाविक व रक्त दाते या सेवेत सहभागी होतात. यावेळी सुद्धा सर्व जनतेने रक्तदान करून संपूर्ण मानवतेची सेवा केली असून संत निरंकारी मंडळ पाचोरा शाखाचे मुख्य प. पू. महेश वाघ यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.