‘त्या’ अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू ; चालकाविरूध्द गुन्हा दाखल

0

जळगाव प्रतिनिधी । जळगाव-शिरसोली रस्त्यावर सोमवारी रात्री अपघातात जखमी झालेले यशवंत मोतीलाल पाटील (वय 37,रा. शिरसोली) यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंत  पाटील हे नातेवाईकांकडून लग्न आपटून जळगावहुन शिरसोली येथे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते दुचाकी (एम.एच.१९, एवाय ०९८६) घरी परतत असताना शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लाँनच्या पुढे पी.एम. स्टाईल दुकानाच्या जवळ मालवाहतूक गाडी (एम.एच १९,एस ८२७५) या वाहनावरील चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात यशवंत पाटील यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना जळगावात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आज दि. २ डिसेंबर पहाटे उपचारादरम्यान पाटील यांचा मृत्यू झाला. याबाबत आज एमआयडीसी पोलीस स्टेशनला मयत यशवंत पाटील यांचे भाऊ भारत मोतीलाल पाटील (रा. शिरसोली प्र. बो.) याच्या फिर्यादीवरून मालवाहतूक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय गणेश कोळी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.