गीतांजली एक्स्प्रेसच्या धडकेत रिंगणगाव येथील प्राैढाचा मृत्यू

0

जळगाव  : एरंडाेल तालुक्यातील रिंगणगाव येथील प्राैढाचा रेल्वे रुळ अाेलांडत असताना गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी शहरातील बजरंग बाेगद्याजवळील पेट्राेल पंपासमाेर घडली. गजानन सुकलाल महाजन (वय ४०) असे मृताचे नाव अाहे.

महाजन हे रेल्वे रुळ अाेलांडत असताना डाऊन लाइनवर येत असलेल्या गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनची त्यांना धडक बसली. त्यामध्ये त्यांचे डाेके, हातपाय सर्व तुटून पडल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर तेथे माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती. मृताच्या खिशात असलेल्या फाेटाेवरुन त्यांची अाेळख पटली. फाेटाेवर गजानन सुकलाल महाजन असे लिहिलेले हाेते. बजरंग बाेगदा परिसरात राहणाऱ्या रिंगणगावच्या नागरिकांनी मृतदेह अाेळखला. त्यानंतर अपघाताबाबत नातेवाइकांना माहिती देण्यात अाली. महाजन यांचे बांभाेरी पेट्राेलपंपाजवळ पंक्चरचे दुकान अाहे. या दुकानावर येण्यासाठी दरराेज ते अप-डाऊन करीत हाेते. त्यांच्या पश्चात अाईवडील, पत्नी व मुलगा असा परिवार अाहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाेहमार्ग पाेलिस अनिंद्र नगराळे हे करीत अाहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.