कोरोना रोखण्यासाठी पालिका फंडातून खर्च करून आयुर्वेदीक औषधोपचार करा!

0

माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार यांची प्रशासकाकडे मागणी

भडगाव(प्रतिनिधी) : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयुष मंत्रालय पुरुस्कृत आयुर्वेदीक औषधोपचार शहरात करुन त्याचा खर्च नगरपरीषद फंडातुन करावा अशी मागणी नगरसेवक तथा नगरपरीषद गट नेता प्रशांत दत्तात्रय पवार यांनी प्रांतधिकारी तथा प्रशासक राजेद्र कचरे यांच्या कडे केली आहे.

भडगाव शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणुचा नायनाट करण्यासाठी मुंबई, पुणे येथिल तरुण  आयुर्वेदीक औषधोपचार करुन प्रयत्न करीत आहे. या तरुण  कडुन यापुर्वी मुंबई, पुणे, बुलढाणा येथे लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन आपल्या आयुर्वेदीक उपचार पध्दतीने उपचार केले आहे. आयुर्वेदीक उपचार पध्दत भारत सरकारच्या आयुष मंत्रालय कडुन पुरुस्कृत केलेली आहे. एनईएमए या आयुर्वेदीक औषधपचार संघटनेच्या अधिकृत नोंदणी केली जात आहे. यांस अंदाजे एक हजार व्यक्ती मागे साधारणपणे २० ते ३० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय कडुन पुरुस्कृत केलेली ही औषधउपचार पध्दत भडगाव शहरात राबवुन हा होणारा खर्च नगरपरीषद फंडातुन करावा जेणे करुन शहर कोरोना मुक्त होण्यास मदत होईल अशी मागणी नगरपरीषद प्रशासक तथा प्रातधिकारी राजेद्र कचरे यांच्या कडे नगरसेवक तथा गटनेते प्रशांत पवार यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन नगरपरीषद मुख्यधिकारी विकास नवाळे यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक तथा गटनेते प्रशांत पवार, मुंकुंद पेंटर, जितेद्र पवार, विवेक पवार हे उपस्थित होते.

दरम्यान नगरसेवक तथा गटनेते प्रशांत पवार यानी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गरजु नागरीकांना धान्य वाटप, अर्सोनिक अल्बम ३० गोळ्या वाटप केली असुन इतर आर्थिक मदत देखिल केली आहे. गरजु लोकाना मदतीसाठी भडगाव तहशिलदार यांना ४ क्विंटल तांदुळ दिले असुन शहरात बॕनर लावुन पत्रक वाटप करुन शहरात जनजागृती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.