अमळनेर(प्रतिनिधी) : भारताचे दिवंगत पंतप्रधान व देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे शिल्पकार राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अमळनेर तालुका व शहर काँग्रेस तर्फे अभिवादन करण्यात आले.
माजी नगरसेवक व जेष्ठ नेते मुन्नाभाऊ शर्मा यांच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.यावेळी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,जेष्ठ नेते जयवंत पाटील,मुन्नाभाऊ शर्मा,सामाजिक कार्यकर्तेप्रसाद शर्मा,रज्जाक शेख,राजेंद्र भाट, गणेश चौधरी, जितेंद्र जैन,नामदेव चौधरी,युवक शहराध्यक्ष तौसिफ तेली आदी उपस्थित होते.