Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»आनंद वार्ता : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी ११ कोटींचे निवृत्ती वेतन जमा
    जळगाव

    आनंद वार्ता : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी ११ कोटींचे निवृत्ती वेतन जमा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 2, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आनंद वार्ता : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी ११ कोटींचे निवृत्ती वेतन जमा

    जिल्हा परिषद सीईओ मीनल करनवाल यांचा पुढाकार

    जळगाव (प्रतिनिधी): – जळगाव जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि ऑनलाइन प्रणालीद्वारे सुरळीत करण्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मीनल करनवाल यांच्या पुढाकाराने विशेष भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून ४,२४९ सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०२५ चे निवृत्ती वेतन, एकूण ११ कोटी ५ लाख ९९७ रुपये, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता थेट त्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले.

    सीईओ मीनल करनवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे आणि वेळेत दिलेल्या सूचनांमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा दसरा खऱ्या अर्थाने आनंददायी ठरला आहे. त्यांनी दसऱ्यापूर्वीच निवृत्ती वेतन जमा करण्यासाठी अर्थ विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार, अर्थ विभागातील पेन्शन शाखेने तालुकास्तरावरून माहिती गोळा करून तपासणी पूर्ण केली आणि शासकीय प्रणालीद्वारे वेतन नियमानुसार वेळेत कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर जमा केले.

    पारदर्शक कार्यप्रणालीला पाठबळ

    या उपक्रमामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनाला आधार मिळाला आहे. जिल्हा परिषदेची कार्यप्रणाली अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. या यशस्वी उपक्रमासाठी सीईओ मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरीया, सहाय्यक लेखाधिकारी निशीथ शर्मा, कनिष्ठ लेखाधिकारी गुलाबराव पाटील, वरिष्ठ सहाय्यक लेखा सुमेध जाधव आणि तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

    कर्मचाऱ्यांकडून कौतुक

    जिल्हा परिषदेच्या जलद आणि पारदर्शक कार्यप्रणालीला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सीईओ मीनल करनवाल यांच्या या पुढाकाराचे कौतुक होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon Jilha parishad ZP CEO Minal Karanwal ZP news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif