जि.प.च्या ४१ आरोग्यसेविकांना पदोन्नतीचा आनंद !
बदलीच्या दिवशीच सीईओंकडून खास भेट, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव
जि.प.च्या ४१ आरोग्यसेविकांना पदोन्नतीचा आनंद !
बदलीच्या दिवशीच सीईओंकडून खास भेट, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव
जळगाव: जिल्हा परिषदेच्या ४१ आरोग्यसेविकांना आरोग्य सहाय्यिकापदी पदोन्नती मिळाली असून, यामुळे आरोग्य विभागात आनंदाचे वातावरण आहे. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या या पदोन्नत्यांना अखेर गती मिळाली आहे. विशेष म्हणजे, बदलीच्या दिवशीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीअंकित यांनी कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट दिली.
दोन वर्षांची प्रतीक्षा संपली
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त पदांमुळे आरोग्यसेवांवर परिणाम होत होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता, ही पदभरती अत्यावश्यक होती. मात्र, पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने अनेक आरोग्य सेविका हताश होत्या. अखेर, सेवा ज्येष्ठतेनुसार समुपदेशनाद्वारे सीईओ श्रीअंकित यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली.
सीईओंच्या निर्णयाने आनंदोत्सव
पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा क्षण सुखद होता. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर झाला. बदलीच्या दिवशीच सीईओंनी पदोन्नतीची घोषणा केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही प्रतीक्षा पूर्ण झाल्याने आरोग्यसेविकांनी समाधान व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे आभार मानले आहेत. पदोन्नतीमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.