जिल्हापरिषद कर्मचारी क्रिकेट टुर्नामेंट २०२२ चे विजेता ठरला सार्वजनिक आरोग्य विभागाचा संघ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दरवर्षी जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध विभागांमध्ये क्रिकेट सामन्यांच्या टुर्नामेंटच आयोजन केले जाते. त्यानुसार या वर्षाच्या क्रिकेट टुर्नामेंटचे सामने जीएस ग्राऊंड जळगाव येथे खेळवण्यात आले. त्यात जि.प.सार्वजनिक आरोग्य विभागाचा संघ टुर्नामेंट २०२२ चे विजेता ठरला आहे.

१३ फेब्रुवारी रोजी जि.प. आरोग्य विभागाने सुरुवातीपासुन उपांत्य फेरीपर्यंत सर्व सामने जिंकुन थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला व दुसर्‍या बाजुने उपांत्य फेरीत सामान्य प्रशासन विभाग व ग्रामसेवक पाचोरा संघ यांच्या चुरशीची लढत बघायला मिळाली, त्यात सा. प्रशासन विभागाने ग्रामसेवक पाचोरा संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभुत करुन अंतिम सामना गाठला.

त्यानंतर जि.प.सीईओ डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी खैरनार, आशिया मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत जि.प.आरोग्य विभाग व सामान्य प्रशासन विभाग यांच्यामध्ये अंतिम सामन्यात खेळवण्यात आला. या सामन्यात सामान्य प्रशासन विभागाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु आरोग्य विभागाच्या भेदक गोलंदाजीमुळे सा.प्र.विभागाला ७ षटकांमध्ये केवळ ५७ धावा करता आल्या.

दुसर्‍या सत्रात आरोग्य विभागाचे फलंदाज समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आलिम शेख, तेजकीरण राजपुत, सौरव चौधरी या तिघच फलंदाजांनी अवघ्या ४ षटकांमध्येच ५८ धावांच लक्ष पुर्ण करत अंतिम सामन्यात विजय मिळवला व जिल्हापरीषद कर्मचारी क्रिकेट टुर्नामेंट २०२२ चा विजेता चषक जि.प. आरोग्य विभागाने पटकावला. सदरील सामन्यात डॉ. अलिम शेख यांना सामनावीर पुरस्कार तर आरोग्य विभागाचे तेजकीरण राजपुत यांना मालिकावीराचे पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याहस्ते विजेता संघाचे कर्णधार डॉ. अभिषेक ठाकुर, उपकर्णधार अजय चौधरी, प्रमोद रगरे, डॉ. अलिमुद्दीन शेख, तेजकीरण राजपुत, सुनिल ढाके, विषाल चौधरी, सौरव पवार, डॉ. रमीझ सय्यद, अजित बाविस्कर, डॉ. इलुमुद्दिन, सुनिल विसपुते, जाबीर मुजावर यांना जि.प.क्रिकेट टुर्नामेंटचा विजेता चषक प्रदान करण्यात आला. जि.प.चे सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना विजयी संघाला शुभेच्छा देऊन येणार्‍या वर्षांमध्ये विविध क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यासाठी जि.प. च्या वतीने विशेष निधीची तरतूद करुन खेळाडुंना अधिक प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन सीईओंनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.