‘झीनत अमान’ यांचा बॉसी लूक, सोशल मीडियावर व्हायरल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

‘झीनत अमान’ (Zeenat Aman) बोललीवूडचं प्रसिद्ध नाव, कसलाही सोशल मीडियाचा सोर्स नसतांना आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री झीनत अमान अजूनही तितक्याच स्टायलिश बघायला मिळतात. कालांतराने झीनत यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु, त्यांची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. त्यामुळेच सध्या त्यांचं बॉसी लूकमधील एक फोटोशूट चर्चेत आलं आहे. तरुण अभिनेत्रींनाही लाजवेल असे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

 

बॉलिवूडपासून दूर गेलेल्या झीनत आमन सोशल मीडियावर सक्रीय झाल्या आहेत. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. त्यामुळे वरचेवर त्या नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. यात नुकतंच त्यांनी नवीन फोटोशूट केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.