विहिरीतून पाणी काढतांना पडल्याने युवकाचा मृत्यू

0

पाचोरा तालुक्यातील आर्वे फाटा येथील घटना

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क

शेतात काम करणाऱ्या आपल्या आईवडिलांना पिण्यासाठी दुसऱ्या शेतामधून पाणी आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन विहरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाचोरा – जामनेर रोड वरील आर्वे फाट्या नजीक अंतुर्ली येथील वना मोतीराम पाटील हे २० वर्षा पासून येथील डॉ. संघवी यांच्या शेतात मोल मजूरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

ते नेहमी प्रमाणे शेतात काम करत असतांना वना मोतीराम पाटील, समाधान उर्फ बाळु वना पाटील, अमोल वना पाटील, आई प्रतिभा वना पाटील रा. अंतुर्ली नं. १ ह. मु. आर्वे ता. पाचोरा हा परिवार शेतात काम करत असतांना समाधान उर्फ बाळु (वय – २३) यास पाणी पिण्यासाठी शेजारील बोहरी यांच्या शेतातील विहीरी वरुन पाणी घेऊन येण्याचे सांगितले.

समाधान हा शेजारी असलेले बोहरी यांच्या शेतातील विहीरी वर पाणी आणायला गेला होता. पिण्यासाठी पाणी काढत असतांना त्याचा विहिरित तोल जाऊन तो विहिरित पडला. बाजूला काम करत असलेले वडील व भाऊ यांना विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज आल्या त्यांनी तात्काळ विहीरीकडे धाव घेतली. त्यांनी पाहिले की मुलगा समाधान विहिरित पडला असुन त्यांनी समाधान यास वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले‌. दोर विहिरित टाकला परंतु समाधानला दोर पकडण्यात अपयश आले. समाधान हा मृत्युशी झुंज देत होता.

वडील गयावया करत होते. परंतु शेजारी कोणीही नसल्याने समाधान हा खाली बुड़ुन तो तळाशी गेला. मग ही वार्ता आर्वे, लोहारी गावात पसरली. दरम्यान आर्वे व लोहारी ग्रामस्थांनी आर्वे फाटा, डॉ. संघवी यांच्या शेताकडे धाव घेतली. आर्वे येथील एका तड़वी बांधवाने समाधान ला विहीरीतुन बाहेर काढत तात्काळ पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी समाधान यास मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करत आहेत. अतिशय मनमिळाऊ व शांत स्वभावाचा समाधान याच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे‌.

Leave A Reply

Your email address will not be published.