time warner cable best buy gift card status ideal shape coupon code december 2015 best buy directv 0 gift card jbf tulsa coupon
Monday, December 5, 2022

सिनेट पदवीधर मतदार नावनोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी – युवासेनेची मागणी

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पदवीधर मतदान नावनोंदणी सुरु आहे. नवीन मतदार नाव नोंदणीसाठी १८ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

बऱ्याच पदवीधारकांकडे पदवीधर प्रमाणपत्र नाही आहे, त्यांना पदवी प्रमाणपत्र काढण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी लागत आहे. नावनोंदणी ऑनलाईन असल्याने अनेक वेळा फॉर्म भरतांना सर्व्हर बंद पडत आहे, अतिवृष्टीमुळे काही भागात वीजखंडीत होत असल्याने फॉर्म भरणे अवघड घेत आहे. जास्तीत जास्त पदवीधारकांना नोंदणी करता यावी म्हणून विद्यापीठाने मुदत वाढ द्यावी या विषयाचे निवेदन युवासेनेतर्फे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना देण्यात आले. डॉक्टर माहेश्वरी यांनी सकारात्मक प्रतिसाद व आश्वासन दिले.

यावेळी युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी विशाल वाणी, उप-जिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, अमोल मोरे, अंकित कासार, अमित जगताप, यश सपकाळे, प्रीतम शिंदे, यश लोढा आदी उपस्थितीत  होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या