भविष्यातील करिअर घडविण्यासाठी युवक महोत्सवाचा निश्चितच फायदा – ना. गुलाबराव पाटील

0

जळगावात युवारंग युवक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

जळगाव.;- भविष्यातील करिअर घडविण्यासाठी युवक महोत्सवाचा निश्चितच फायदा होणार असून विद्यार्थी कलावंतांनी या महोत्सवात आपले अंगभूत कलागुण दाखवावेत असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करतांना श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, आ. सुरेश्‍ भोळे, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, महोत्सवाचे कार्याध्‌यक्ष राजेंद्र नन्नवरे, सहसंचालक प्रा.संतोष चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.शिवाजी पाटील, प्रा. साहेबराव भूकन, प्राचार्य संजय सुराणा, प्रा.सुरेखा पालवे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, ॲङ अमोल पाटील, नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य एस.एन. भारंबे, राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल राव, भरत अमळकर, प्र. अधिष्ठाता प्राचार्य एस.एस.राजपूत, प्राचार्य ए.पी. खैरनार, प्राचार्य अशोक राणे, ॲङ प्रमोद पाटील, भालचंद्र पाटील, डॉ. हर्षवर्धन जावळे, ॲङ प्रवीणचंद्र जंगले, रुपेश चिरमाडे, संजय प्रभूदेसाई, सीए रवींद्र पाटील, प्रा.योगेश पाटील, डॉ.जुगलकिशोर दुबे, डॉ.मनोज महाजन यांची उपस्थिती होती.

गुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, महाविद्यालयात शिकत असतांना मी अभ्यासात पक्का नव्हतो पण कलेमध्ये पुढे होते. त्या कलेचा फायदा मला राजकारणात झाला. आणि राजकारणात चांगली संधी मिळत गेली. तुम्ही किती शिकलात यापेक्षा तुमची मांडणी कशी आहे. हे आज महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे कला सादर करतांना उत्तम करा. यातून उद्यााचे कलावंत घडणार आहेत. जे राज्यात आपला स्वतंत्र ठसा उमटवतील . या महोत्सवात मुलींचा सहभाग वाढल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठ हे सातत्याने विविध उपक्रमांसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून कोविड नंतर यंदा प्रथमच पहिल्या सत्रात युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जेणेकरुन यातील विद्यार्थ्यांना इंद्रधनुष्य स्पर्धेत सहभाग घेता येईल. या महोत्सवात शिस्त पाळा. शिस्तीचे महत्व लक्षात आल्यास जीवनातील प्रत्येक टप्प्यावर शिस्त महत्वाची आहे हे तुम्हाला लक्षात येईल. सर्वांचे कला प्रकार बघा असे आवाहन केले. भविष्यातील नामवंत कलावंत या माध्यमातून करीअर निवडलेला विद्यार्थी होऊ शकतो. आता तर नव्या शैक्षणिक धोरणात मुख्य विषयाबरोबर आवडीचा विषय निवडण्याची मूभा देण्यात आली आहे. त्यांनी माहिती व ज्ञान, जोडणी व नाते व आनंद याबद्दल तरूण पिढीमध्ये काही गोंधळ आहे असे सांगून यातील फरक विषद केला. विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि क्षमता हे गुरु मानावेत, अभिमान व अहंकार यातील फरक शोधावा.

श्री. विकासचंद्र रस्तोगी यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी हट्ट धरावा असे आवाहन करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना सर्वव्यापी व परिपूर्ण शिक्षण मिळेल असे मत व्यक्त केले. असे महोत्सव म्हणजे वर्ग खोलीच्या बाहेर शिकण्याची व व्यक्तीमत्व घ्डविण्याची संधी असल्याचे ते म्हणाले. श्री अशोक जैन यांनी करिअर घडविण्यासाठी कला हा देखील मार्ग आहे. या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करून वाटचाल करा अडचण आल्यास सहकार्य करण्याची ग्वाही श्री. जैन यांनी दिली.

स्वागतपर मनोगतात युवारंग कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य व के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी सांगितले की, स्वातत्र्यपूर्व काळात तत्कालीन शिक्षणाची गरज ओळखून केसीई संस्थेची स्थापना करण्यात आली असून शैक्षणिक क्षेत्रात ही संस्था ऋषीतूल्य म्हणून काम करीत आहे. नव्यापिढीने भगवद् गीतेतील तत्व उराशी बाळगावे असे आवाहन केले.

या महोत्सवाचे कार्याध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्न्वरे यांनी देशाने विकासात आघाडी घेतली असून चांद्रयान मोहिम यशस्वी झाली, आशियाई स्पर्धेत १०० पेक्षा अधिक पदके भारताने मिळवली. विकसित भारतासाठी पंचप्रण देण्यात आले आहेत. हा वारसा विद्यार्थ्यांनी जोपासावा असे आवाहन केले.

विद्यार्थी विकास विभागाचे संचालक व महोत्सवाचे संयोजक प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी विद्यापीठाची भूमिका विशद करतांना सांगितले की, ४५० विद्यार्थी आणि ८२५ विद्यार्थिनी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ कटीबध्द आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोककला महोत्सव, विद्यार्थी साहित्य संमेलन व दिव्यांग कला महोत्सवाचे आयोजन विद्यापीठाकडून करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर प्रा. कपील शिंगाने आणि विद्यार्थी यांनी राज्यगीत सादर केले. डॉ.अखिलेश शर्मा यांनी इशस्तवन केले. विद्यार्थिनी दिप्ती पाटील हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन वातावरणात स्फुरण चढविले. सूत्रसंचालन डॉ.भाग्यश्री भलवतकर व डॉ.योगेश महाले यांनी केले.

यावेळी अधिसभा सदस्य प्राचार्य बी.युवाकुमार रेडडी, प्राचार्य सुनील पाटील, प्राचार्य आर.आर.अत्तरदे, प्राचार्य जे.बी. अंजने, प्रा. मंदा गावीत, दीपक पाटील, विष्णू भंगाळे, नितीन ठाकूर, अमोल मराठे, अमोल सोनवणे, प्रा.संदीप नेरकर, प्रा.गजानन पाटील, स्वप्नाली काळे, सुरेखा पाटील, ऋषीकेश चित्तम, रासेयेा संचालक प्रा.सचिन नांद्रे, डॉ. सी.पी.लभाने, प्रा. पी.आर.चौधरी, एस.आर.गोहिल, प्राचार्य व्ही.आर.पाटील. इतर शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा संदेश दिलेली ध्वनीफित दाखविण्यात आली. या महोत्वामधून प्रशांत दळवी, अश्चिनी भावे यासारखे लेखक, कलावंत घडले आहेत. त्यामुळे महोत्सवाचा फायदा घ्या. छत्रपती शिवरायांचे विचार तरूणपिढी पर्यंत पाहचते करा. असे आवाहन या संदेशात त्यांनी केले.

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन व्यवस्थापन परिषद सदस्य अॅङ अमोल पाटील यांनी केले. युवक महोत्सवाला शुभेच्छा देतांना श्री. महाजन यांनी निर्व्यसनी रहा, व देशाच्या विचारासाठी जगा असे आवाहन तरूणाईला केले.

Leave A Reply

Your email address will not be published.