Sunday, November 27, 2022

धमकीच्या भीतीने तरुणाची आत्महत्या; ६ जणांवर गुन्हा

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

चोपडा (Chopda) येथील तरुणाला बलात्काराचा गुन्हा दाखल (Crime of Rape) करण्याची भिती दाखवत विस हजार रुपयांची मागणी केल्याने घाबरलेल्या तरुणाने आत्महत्या (Youth suicide) केली होती. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला (Chopda City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शाहीद मुन्ना शेख (वय 20, रा. केजीएन कॉलनी चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने 22 जुलै रोजी दुपारी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली होती. या घटनेप्रकरणी मयत शाहिद याच्या वडीलांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत शाहीद याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्या प्रेमसंबंधाचा धागा पकडून संबंधीत महिलेसह एकुण सहा जणांनी शाहीद याच्याकडे विस हजार रुपयांची मागणी केली होती. विस हजार रुपये दिले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करु अशी त्याला धमकी देण्यात आली होती.

या धमकीच्या भितीपोटी घाबरुन विस वर्षाच्या शाहीदने विषारी पदार्थ प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवल्याचे म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकारणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. संतोष चव्हाण करत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या