Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत तरूण ठार
    अपघात

    राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत तरूण ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 24, 2026No Comments365 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    राष्ट्रीय महामार्गावर सांगवी फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला मागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाच्या जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. योगेश सयाजी पाटील, वय ४१ रा. सांगवी ह. मु. शिक्षक कॉलनी चाकण, पुणे असे मृत तरुणाचे नाव आहे.

    तरुण योगेश पाटील हा चाकण, पुणे येथे नोकरीस होता. तो आपल्या सांगवी गावी एका अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी आला होता. पुणे येथे परत जाण्यासाठी तो आज मोटर सायकल क्र. एमएच १९ सीक्यू ४०५३ ने पारोळा शहरामध्ये ट्रॅव्हल चे तिकीट बुक करण्यासाठी घरून निघाला होता. यावेळी सांगवी फाट्याजवळ भरधाव मालवाहू ट्रक क्र. जीजे ११ वीवी ९२९१ ने तरुणाच्या मोटरसायकलला मागून जोरात धडक दिल्यावर तो चाकात येऊन चिरडल्याने जागीच गतप्राण झाला.

    याबाबत आंनद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध (नाव गाव माहीत नाही) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दीपक पाटील हवालदार डॉ. शरद पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. या घटनेने सांगवी गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif