Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»पाझर तलावात बुडून तरुणाचा अंत!
    अपघात

    पाझर तलावात बुडून तरुणाचा अंत!

    दोन महिन्यांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 6, 2026No Comments209 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणाचा शिरसोली जवळ (चंबार दडी) पाझर तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऋषिकेश उत्तम कचरे (वय 28, रा. हनुमान नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शामाफायरच्या पाठीमागील चंभारदरी पाझर तलावात घडली.

    ऋषिकेश कचरे हा त्याच्या काही मित्रांसोबत चंभारदरी पाझर तलावाजवळ पार्टीसाठी गेला होता. या दरम्यान, मला पोहता येते असे सांगून तो तलावाच्या पाण्यात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा योग्य अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले.

    घटनास्थळावरून माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी चेतन पाटील, धनराज गुळवे,शिरसोली पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी तातडीने धाव घेतली. ऋषिकेशला पट्टीचे पोहणारे तीन जणांनी पाण्यात बाहेर काढले घटनास्थळा वरुन तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले.

    ऋषिकेश कचरे याचा दीड वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तो रोजंदारीवर हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. कमावता आणि तरुण मुलगा गमावल्यामुळे कचरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif