Thursday, September 29, 2022

दुचाकीसह पुलावरून कोसळून युवकाचा मृत्यू

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पुणे

- Advertisement -

- Advertisement -

शिक्रापूर : दुचाकीसह पुलावरून कोसळून युवकाचा मृत्यू. पुणे-नगर रोड जवळील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथील रस्त्याने पुण्याकडून अहमदनगरकडे जात असताना रात्रीच्या सुमारास एक युवक दुचाकीसह पुलाच्या खाली कोसळला. त्यात त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. किरण दिगंबर पाटील असे या घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथील रस्त्याने पुण्याकडून अहमदनगरकडे जात असताना रात्रीच्या सुमारास एक युवक दुचाकीसह पुलाच्या खाली कोसळला असल्याचे पाठीमागून आलेल्या नागरिकांना दिसले. याबाबत माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस व काही ग्रामस्थ यांनी सदर ठिकाणी जात पहाणी केली.

विजेची व्यवस्था करत ओढ्याच्या पाण्यामध्ये पडलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्यामध्ये पडलेली दुचाकी बाहेर काढण्यात यश आले. मात्र, पाण्यामध्ये पडलेल्या व्यक्तीचा पाण्याची खोली व त्यामधील गाळ यामुळे शोध लागत नव्हता.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमक दलाच्या जवानांनी येथे धाव घेतली. याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अग्निशमन अधिकारी विजय महाजन, रांजणगाव ओद्योगिक वसाहतीतील अग्निशमन अधिकारी वैभव तांडे, जवान अक्षय नेवसे, शुभम यादव, संदीप तांबे, सचिन पिसाळ, भाऊसाहेब बागुल, मयूर गोसावी, अक्षय बागल यांसह आदींनी पाण्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. त्यावेळी त्याचे नाव किरणकुमार दिगंबर पाटील (वय ४२ वर्षे रा. दत्तनगर चाकण रोड शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मरवाडी ता. नायगाव जि. नांदेड) असल्याचे समोर आले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या