मेहुणबारे येथे १८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मेहुणबारे परिसरात एका १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत तरुणाचे नाव जयसिंग बाबाजी राजपूत (वय १८, रा. पिंपळवाड म्हाळसा, ता. चाळीसगाव) असे आहे. गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. ग्रामीण रुग्णालय मेहुणबारे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जयसिंग यास त्याचे नातेवाईक ज्ञानेश्वर भगवान राजपूत यांनी मयत अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेची लेखी माहिती (मेमो) प्राप्त झाल्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ/३२६१ विकास खैरे हे करीत असून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.