Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दारू उशिरा आणल्याच्या वादातून तरुणाची हत्या
    गुन्हे वार्ता

    दारू उशिरा आणल्याच्या वादातून तरुणाची हत्या

    सीसीटीव्ही आणि सोशल मीडिया रीलवरून आरोपींचा शोध
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 29, 2026No Comments355 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारू आणण्यासाठी उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ओमकार चंद्रकांत सूर्यवंशी असे मृत तरुणाचे नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील रामनगर सांगवी परिसरातील रहिवासी होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार हा मासे विक्रेता होता. १८ मे रोजी लवकी गावाजवळील शेतात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात मृतदेह ओमकार सूर्यवंशी याचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयित दुचाकीचा माग काढत पोलिसांनी शोरूममधून मागील चार वर्षांचा डेटा गोळा केला.

    त्याचवेळी सोशल मीडियावर “टपका रे टपका” या गाण्यावर तयार केलेली एक रील सायबर पोलिसांच्या हाती लागली. या रीलमधील चेहरे आणि सीसीटीव्हीतील संशयितांची ओळख जुळल्यानंतर आरोपी नांदेडमधील असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिस कर्मचारी बाबासाहेब काकडे आणि सूरज अग्रवाल यांनी भाजीपाला विक्रेत्याचा वेश धारण करून नांदेडमधील गुन्हेगारी वस्तीत सलग तीन दिवस पाळत ठेवली. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी परराज्यात फरार झाले होते. मात्र ते परत आपल्या राहत्या घरी येताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.

    या प्रकरणात रवी देविदास दुधमल (१९), सय्यद हाशिम सय्यद हसन (१८) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस तपासात ही हत्या दारू उशिरा आणल्याच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, संजय जगताप आणि विशेष पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif