Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    • शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला
    अपघात

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    ट्रकखाली चिरडून शाखा अधिकाऱ्याचा मृत्यू : तरसोद बायपास प्रकरण पुन्हा तापणार?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2026No Comments560 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरातील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर गुरुवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र छबुलाल चौधरी (वय ३५, मूळ रा. उत्राण, ता. एरंडोल, ह.मु. चंदूअण्णानगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र चौधरी हे मोतीलाल ओसवाल या खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे एमएच १९ डीएन १२८२ क्रमांकाच्या हिरो एचएफ डिलक्स दुचाकीवरून कामावर निघाले होते. दरम्यान, आकाशवाणी उड्डाणपुलावर मागून येणाऱ्या आरजे ५० जीए ९२३४ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर कोसळले आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. तसेच अपघातग्रस्त ट्रक आणि दुचाकी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

    रवींद्र चौधरी यांच्या पश्चात पत्नी आणि वृद्ध आई असा परिवार आहे. ते कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबाचा मुख्य आधार हरपला आहे. रुग्णालयात जमलेल्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावून गेले.

    दरम्यान, तरसोद बायपासवरील वाहतूक शहरातून वळविण्यात आल्यानंतर जळगाव शहरातील रस्त्यांवर जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहरातील अपघात आणि वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील वाहतुकीचे योग्य नियोजन करून प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या दोन बोटी उलटल्या

    November 5, 2026

    दिल्ली बाजारात तीन मजली इमारत कोसळली

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif