Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»छातीत तीव्र वेदना झाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
    अपघात

    छातीत तीव्र वेदना झाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 3, 2026No Comments575 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तालुक्यातील शिरसमणी येथील एका 32 वर्षीय तरुणाचा छातीत अचानक तीव्र वेदना होऊन उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चेतन दैवत पाटील (वय 32, रा. शिरसमणी, ता. पारोळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास चेतन याने त्याच्या कुटुंबीयांना छातीत दुखत असल्याचे आणि ॲसिडिटी झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने ॲसिडिटीची गोळी घेतली व त्याचा त्रास काहीसा कमी झाल्याचे त्याने सांगितले. मात्र, सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास चेतन याच्या छातीत पुन्हा तीव्र वेदना सुरू झाल्याने तो जोराने रडू लागला.

    परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या वडिलांनी गावातील गोकुळ गिरधर पाटील, विकास संजय पाटील आणि भय्या नाना पाटील यांच्या मदतीने त्याला खाजगी वाहनाने पारोळा येथील पाटील हॉस्पिटलमध्ये सकाळी 10 वाजेच्या सुमारास दाखल केले. डॉ. संकेत खैरे यांनी प्राथमिक पाहणी करून चेतन याला पुढील उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात संदर्भित केले. त्यानंतर कुटीर रुग्णालय येथे आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकाळी 10.30 वाजता चेतन यास तपासून मृत घोषित केले.

    या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांच्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्यात नोंद क्रमांक 80/2026 नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक पाटणल यांनी तपासाचे निर्देश दिले. या घटनेचा पुढील सखोल तपास पोलीस नाईक चंद्रशेखर सोनवणे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif