Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने तरुणाचा अंत
    अपघात

    ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने तरुणाचा अंत

    मानराज पार्क चौफुलीवर भीषण अपघात : शहरात खळबळ
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 27, 2026No Comments716 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव

    शहरात रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आज मानराज पार्क चौफुलीवर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम सुनील गिरी असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

    याबाबत असे की, ओम सुनील गिरी हा आपल्या दुचाकीने मानराज पार्क चौफुलीवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की ओम थेट ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याला काही अंतर फरपटत नेण्यात आले. या भीषण अपघातात ओमचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत ओमने प्राण सोडले होते. अपघाताची माहिती मिळताच ओमच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या तरुण मुलाचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहून त्याच्या आई आणि बहिणीने केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

    मानराज पार्क चौफुलीवर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते, मात्र गतिरोधक आणि सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहनचालक सुसाट वाहने चालवतात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आज एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी येथे तातडीने सिग्नल बसवण्याची मागणी केली आहे. अपघातामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. नागरिकांच्या मदतीने ओमचा मृतदेह उत्तरविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif