Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»खताचे ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
    अपघात

    खताचे ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 24, 2026No Comments315 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    खताचे ट्रॅक्टर शेतात घेवुन जात असताना अचानक ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लोहटार ता. पाचोरा येथे घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

    पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील सागर दिलीप पाटील (वय – २२ वर्ष) हा तरुण शेतकरी २४ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात खताचे ट्रॅक्टर घेवुन जात असताना अचानक ट्रॅक्टर पलटी झाल्याने या अपघातात सागर पाटील हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे श्रेणी पो. उ. नि. सुनिल पाटील, पांडुरंग सोनवणे हे रुग्णवाहिका चालक भागवत पाटील यांचेसह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिस व ग्रामस्थांनी सागर पाटील यास पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात आणल्यानंतर उपचार सुरू असतांनाच सागर पाटील याचा मृत्यू झाला.

    सागर पाटील हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सागर पाटील हा अविवाहित असुन त्याचे पाश्चात्य वृद्ध आई, एक बहिण असा परिवार असुन तो पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील यांचा पुतण्या होता. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास श्रेणी पो. उ. नि. पांडुरंग सोनवणे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif