Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»कावड येत्रात भरधाव ट्रक घुसल्याने चिमुकल्याचा मृत्यू
    अपघात

    कावड येत्रात भरधाव ट्रक घुसल्याने चिमुकल्याचा मृत्यू

    जळगावात ममुराबाद रोडवर थरार : संतप्त जमावाने पेटवला ट्रक : चालकाला बेदम मारहाण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 24, 2026No Comments800 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव

    जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावर प्रजापती नगराजवळ सोमवारी कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात झाला. देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या दहा वर्षीय चिमुकल्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला तसेच चालकाला मारहाण केली. जमावाने रास्ता रोको केल्याने काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.

    मयत मुलाचे नाव प्रबल राजू गवळी असून तो दहा वर्षांचा होता. तो गवळीवाडा, शनिपेठ येथे राहत होता. कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ममुराबाद रस्त्यावर भाविकांची मोठी वर्दळ होती. याचदरम्यान प्रजापती नगराजवळील देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडताना प्रबलला ट्रकने धडक दिली. धडक एवढी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाला.

    अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत रास्ता रोको केला. जमावाने ट्रकचालकाला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्या काही व्यक्तींनाही जमावाने मारहाण केल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

    अपघातातील ट्रकचालकाचे नाव उबेद खान इकबाल खान पठाण असून त्याचे वय 34 वर्षे आहे. तो चोपडा येथील रहिवासी आहे. संबंधित ट्रक जळगाव ते चोपडा या मार्गावर किराणा माल व रेशन वाहतूक करीत होता. ट्रकचे मालक भूपेंद्र नटवरलाल गुजराती असून वाहन क्रमांक एमएच-20-ईजी-3593 आहे. ट्रक आईसर कंपनीचा आहे.

    घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मारहाण झाल्यामुळे ट्रकचालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मयत मुलाचा मृतदेह सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ट्रकला लागलेली आग विझविण्यात आली.

    अग्निशमन बंबाला परत जावे लागले

    बालकाला चिरडणारा ट्रक पूर्ण खाक व्हावा म्हणून संतप्त जमावाने ट्रक विझवण्यासाठी अग्निशमन बंबदेखील जावू दिला नाही, त्यामुळे अग्निशमन बंबाला परत जावे लागले. रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता रस्ता रोको आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. ट्रक चालकाने तब्बल पन्नास मीटर पर्यंत बालकाला चिरडल्यावर फरफटत नेल्याने जमाव संतप्त झाला होता.

    पाळधी बायपास दीड महिन्याने सुरु होणार

    दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर ममुराबाद रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, एनएचएआय (नही) अधिकारी आणि पत्रकारांच्या उपस्थितीत पाळधी बायपासवरील वाहतुकीची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर वाहतुकीसंदर्भात उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. घटनेनंतर पोलिस अधीक्षकांनी एनएचएआय (नही) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. एनएचएआयच्या माहितीनुसार संबंधित महामार्ग आणखी सुमारे दीड महिना सुरू होण्याची शक्यता नसल्याने बायपासवरील वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. या अपघाताच्या घटनेचा पुढील तपास जळगाव पोलिसांकडून सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif