Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»काय सांगता! आज सूर्य उगवलाच नाही!
    हवामान

    काय सांगता! आज सूर्य उगवलाच नाही!

    सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राला झोडपले : आणखी धुणार!
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 24, 2026No Comments251 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबईसह राज्यात मॉन्सून दाखल झाला. जोरदार पाऊस सर्वदूर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मॉन्सून राज्यात दाखल झाला. दमदार पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. 24, 25, 26, 27, 28 पर्यंत राज्यात असाच धो धो पाऊस राहण्याचा अंदाज आहे. अनेक भागात रात्रभर पाऊस सुरू आहे.

    मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर पाऊस होता. अनेक भागात पाणी साचले आहे. कुर्ला, किंग सर्कल आणि सायनमध्ये पाणी साचले. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला. मॉन्सून राज्यभरात पसरला आहे. पुढील 3 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. या पावसामुळे रस्ते जलमय झाले. पुढील दोन ते तीन दिवस अरबी समुद्र, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशच्या दिशेने मॉन्सून पुढे सरकत आहे.

    मुंबई उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. काल संध्याकाळपासून कांदिवली, मालाडसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कांदिवलीतील गणेश नगर आणि मालाड पूर्व येथील कुरार गावातील कोंकणी पाडा या भागात पावसाचे पाणी साचले आहे. याशिवाय इतरही अनेक सखल भागात जलजमावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

    काल संध्याकाळपासून पाऊस थांबलेला नाही. अधूनमधून जोरदार सरी येत आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या उपनगरात पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाची हजेरी

    अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची सुरुवात. काल काही भागांत पावसाचा जोर वाढल्याने पाणी साचल्याच्या घटना. मात्र काही वेळातच पावसाचा वेग कमी होताच साचलेल्या पाण्याचा झाला निचरा. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, वातावरणात गारवा तर दुसरीकडे पावसामुळे अनेक ठिकाणी महावितरणाची खांब पडल्याने बत्ती गुल झाली. राज्याभरात पाऊस बघायला मिळत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका

    August 10, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif